सुतार समाज विकास संस्थेची स्थापना जुलै 2004 ला अमरावती येथे झाली. त्याच वर्षी 2004 मध्ये राज्यस्तरीय महाचर्चा व 2005 मध्ये सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला दरवर्षी गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर संपन्न होतो. सुतार समाज विकास संस्थेतर्फे 2005 मध्ये महिला करिता गृह उद्योग चालू केला, जीवन गट विमातर्फे 100 विद्यार्थ्यांना सहा वर्ष दर महिन्याला प्रति विद्यार्थी तीनशे रुपये देत होतो. तसेच सावरखेड वलगाव जवळील पिढी नदीच्या महापुरामुळे फार मोठे नुकसान झाले असल्यामुळे तेथील सुतार समाजातील गरीब विद्यार्थ्यांना पाठिपुस्तके वाटण्यात आली. असे बरेच कार्यक्रम समाजाच्या हिताकरिता राबविण्यात आलेले आहेत संगीताचा कार्यक्रम ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मध्ये देणगी म्हणून कार्यक्रम घेतला. विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महिला सक्षमीकरण ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असे बरेचसे कार्यक्रम आमच्या संस्थेतर्फे दरवर्षी होत असते त्याचप्रमाणे संस्थेची एक इमारत महादेव खोली मंदिराजवळ बांधलेली आहे आता आम्ही वधू वर सूचक ॲप यावर्षीपासून चालू होत आहे यापुढे सुद्धा समाज उपयोगी समाज हितांचे कार्यक्रम घेण्याचा आमचा मानस आहे.